Next
ट्रम्पेट
- मोहन कान्हेरे
Friday, April 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

इंग्रजी भाषेत ‘To blow one’s own trumpet’ अशी म्हण आहे. म्हणजे सतत स्वत:बद्दल बोलत राहणं, स्वत:ची तारीफ, या ना त्या मार्गानं करत राहणं... इतिहासकारांना ट्रम्पेट या वाद्याचा उगम ख्रिस्तपूर्व १५०० मध्ये सापडला आहे. इजिप्तच्या राजाच्या थडग्यामध्ये या वाद्याचे अवशेष सापडले आहेत. याच वाद्याचे जरा जरा फरक असलेले व्हर्जन्स, चीन, दक्षिण अमेरिका, स्कॅण्डिनेव्हिआ व काही अन्य आशियाई देशांत इतिहासकारांनी शोधले आहेत... त्या काळातली ट्रम्पेट सांगीतिक वापराकरता नव्हती, धार्मिक विधीसाठी व सैन्यात त्यांचा वापर होत असे. राजाच्या आगमनाची सूचना देणं, दूरवर असलेल्या सहकाऱ्याला संकेत देणं असा या वाद्याचा उपयोग होत होता.
ज्याप्रमाणे बिगुल ओठांत धरून, त्यात हवा भरली जाते व ध्वनीची निर्मिती होते, तेच तत्त्व ट्रम्पेटमध्ये पाहायला मिळते. हिंदीत या वाद्याला ‘तुरही’ म्हणतात. या पितळी वाद्याला तीन छिद्रं असतात. त्यांच्या साहाय्यानं टोन (tone) बदलता येतो. आजही हे वाद्य वापरात आहे, मात्र ते वाजवायला (फुंकायला) चांगली ताकद वापरावी लागते. या वाद्याला खूपच मर्यादा आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link